Mala “Manogat” hya website var sapadaleli hi marathi gazal. Manala far bhavali mhanun ithe det aahe.
लपवून आसवांना, हसतो बऱ्याच वेळा
मीही नको नको ते, करतो बऱ्याच वेळा
अंदाज याचसाठी, मी बांधणार नाही …
अंदाज माणसाचा, चुकतो बऱ्याच वेळा
लावू नकोस आता, हा मुखवटा पुन्हा तू
आतील चेहराही, दिसतो बऱ्याच वेळा
सोयी नुसार माझे, असणे हवे तुम्हाला
जाणून हेच मीही, नसतो बऱ्याच वेळा
— अभिमन्यू आळतेकर
Posted by Vin 

